Breaking

Friday, 13 November 2020

दिपावली आनंदाची - आनंद वाटुया, आनंद मिळवूया

नमस्कार

 लॉकडाऊन काळात गरीब व गरजू बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आपण केला होता. त्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यातून आपल्याकडे ₹ १३४५३/- इतका मदत निधी जमा झाला होता.  या मदतनिधीतून आपण २१ कुटुंबांना १५ दिवस पुरेल इतके अन्नधान्य दिले होते. त्याचा एकूण खर्च ₹ १०९९८/- इतका आला आणि        ₹ २४५५/- शिल्लक होते. 


सध्या लॉक डाऊन उठले असले तरी या काळातील आर्थिक दुरावस्थेमुळे ही दिपावली अनेक जण साजरी करू शकत नाहीत. तरी काही मोजक्या गरजू कुटुंबांची दिपावली आनंदात जावी यासाठी वरील शिल्लक निधीचे फराळ घेऊन ते अश्या कुटुंबांना देण्याचा विचार केला. 


आज अश्या १० गरजू कुटुंबांना आपण दिपावली फराळाचे वाटप केले. आपल्याकडील शिल्लक ₹ २४५५/- व माझे ₹ ५४५/- असे एकूण ₹ ३०००/- इतका याचा खर्च आला. 

त्याचे फोटो खाली दिले आहेत. 


आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद.. 


 
 





No comments:

Post a Comment

Pages