Breaking

Sunday, 27 August 2017

हमीद दलवाई व तीन तलाक

मुस्लीम समाजासाठी शाप ठरला हमीद दलवाईंचा मृत्यु...
१९६६ मध्ये हमीद दलवाईंनी मुस्लीम समाजाला अनिष्ठ रूढी, प्रथांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी रणसिंग फुंकले. तीन तलाक, बहुपत्नीत्व, हलाला यांना विरोध केला. तलाकपिडित महिलांसाठी पोटगीची मागणी केली. याचबरोबर मुस्लीम समाजाने मध्ययुगीन मानसिकतेतून बाहेर येऊन आधुनिक जगात आत्मविश्वासाने वावरावे, मुस्लीम समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी दलवाईंनी समाजप्रबोधनाचा मार्ग निवडला, स्थानिक भाषेतून शिक्षण घ्यावे यासाठी प्रचार - प्रसार केला... याच कार्यासाठी १९६६ मध्ये 'सदा ए निस्वा' व १९७० मध्ये 'मुस्लीम सत्यशोधक मंडळ' या संस्था - संघटनांची स्थापणा केली. त्यांचे कार्य जोमाने सुरु झाले.. राज्यभरातून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळू लागला...
पण...
१९७७ साली त्यांचे आकस्मिक निधन झाले व त्यांचे कार्य अपूर्ण राहिले.
परवा सर्वोच्च न्यायालयाने तीन तलाक बंदीचा निर्णय दिला.
हमीद भाईंनी सुधाराणांच्या हेतूने विरोध केलेल्या अनेक प्रथांपैकी एका प्रथेवर आज सुमारे ५० वर्षानंतर बंदी आली. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागतच. पण...
अजून खुप प्रश्न बाकी आहेत, मुस्लीम समाजात आर्थिक, शैक्षणिक सुधारणा होणे अपेक्षित आहेत, मग
एका सुधारणेसाठी जर ५० वर्षे लागली ! (हा कालावधी जरा जास्त वाटत नाही का?) तर पुढे मुस्लीम समाजाचे काय आणि कसे होणार, अजून किती दलवाई यासाठी कामी येणार (निर्माण झाले तर!!) हे व असे अनेक प्रश्न सतावत आहेत...
हमीद भाई विसेक वर्षे जास्त जगले असते तर कदाचित हा सुधारनेचा वेग जास्त असता. पण या जर तर ला काही अर्थ नाही..
मुस्लीम समाजाने यातून धडा घेऊन आत्मोनत्ती करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.... प्रश्न हा आहे कि मुस्लीम समाज या निर्णयाकडे कसे पाहिल...
एक मात्र नक्की, हा वेग जर असाच राहिला तर एक ना एक दिवस नक्कीच "इस्लाम खतरे में" येईल...!

No comments:

Post a Comment

Pages