Breaking

Friday, 23 June 2017

*अरे माणूस म्हणून जगा रे*

*अरे माणूस म्हणून जगा रे*
दिसला मुसलमान म्हण त्याला लांडया, कर त्याचा द्वेष.!
हरिजन दिसला त्याचा द्वेष,
बहुजन दिसला त्याचा द्वेष,
ब्राह्मण दिसला त्याचा द्वेष,
मराठा दिसला त्याचा द्वेष...
द्वेष..
द्वेष..
द्वेष...
नुसता द्वेष...
अरे
कधीतरी..
कधीतरीच
जात - धर्मापलिकडे जा रे..
माणसाकडे माणूस म्हणून बघ..
त्याचे ही प्रश्न आहेत,
समस्या आहेत..
जगण्याची भ्रांत आहे..
दोन वेळ हाता तोंडाचीगाठ पडावी यासाठी श्रम आहेत..
अशावेळी तो नसतो मुसलमान
नसतो हरिजन
नसतो ब्राह्मण
तो नसतो दूधवाला
नसतो शेतकरी
असतो फक्त माणूस
फक्त आणि फक्त माणूस..
जात धर्मापलीकडे जा रे
मानसाकडे माणूस म्हणून बघा रे..
साने गुरुजी सांगून गेले
*खरा तो एकची धर्म*
*जगाला प्रेम अर्पावे*
विनोबांनी नारा दिला
*वसुधैव कुटूबंम*
आणि, आम्ही भांडतोय
तू हिंदू - तू मुसलमान
तू दलित - तू ब्राम्हण ...
कधी तरी माणूस होण्यासाठी
भांडा रे..
मानुसकी जपा रे..
जात धर्मापलीकडे जा रे
द्वेष सोडून मानसाकडे माणूस म्हणून बघा रे..
अझरुद्दीन पटेल, कराड.
9420463191

No comments:

Post a Comment

Pages